“चोरीची रोख रक्कम व गुन्हा करतांना वापरलेल्या वाहनांसह तीघे ताब्यात.”
उस्मानाबाद :- पोलीस ठाणे, आंबी: सुधीर संदीपान बोराडे, रा. पाथ्रुड, ता. भुम हे दि. 23.07.2020 रोजी रात्री 10.30 वा. ऑटोरिक्षाने मौजे देवगाव चौकातून जात होते. यावेळी एक स्वीफ्ट कार क्र. एम.एच. 14- 6151 मधुन आलेल्या दोन व्यक्ती तसेच एका मोटारसायकलवर आलेल्या दोन व्यक्ती अशा 4 अनोळखी व्यक्तींनी ऑटोरिक्षा अडवून थांबवली. त्या चौघांनी ऑटोरिक्षा चालक- विजय खुने यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन सुधीर बोराडे यांच्या विजारीच्या खिशातील 4,000/-रु. जबरीने काढून घेतले होते. यावरुन पो.ठा. आंबी येथे भा.दं.सं. कलम- 394, 34 अन्वये गु.र.क्र. 72 / 2020 दाखल आहे.
सदर गुन्हा तपासात उपविभागीय पोलीस अधिकारी, भुम श्री खांबे यांच्या मार्गदर्शनाखालील आंबी पो.ठा. चे प्रभारी अधिकारी सपोनि- श्री. आशिष खांडेकर, पोउपनि- श्री. वाघूले, पोकॉ- राहुल गायकवाड, अकोस्कर यांच्या पथकाने गुन्ह्यातील आरोपी- योगेश बबन काळे, वय 24 वर्षे, रा. धनेगांव, ता. जामखेड यास दि. 09.10.2020 रोजी धनेगाव शिवारातून ताब्यात घेतले. गुन्हा तपासादरम्यान गुन्ह्यातील त्याचे फरार साथीदार 1)महेश अंकुश शिंदे, रा. चिंचपुर (बु.), ता. परंडा 2)अमोल बाळासाहेब काळे, रा. धनेगांव या दोघांना दि. 11.11.2020 रोजी ताब्यात घेउन गुन्ह्यातील वर नमूद चोरीची रक्कम व गुन्हा करण्यास वापरलेली एक मोटारसायकल व स्वीफ्ट कार जप्त केली आहे