Osmanabad : जिल्ह्यात 3 ठिकाणी मारहाण गुन्हा दाखल

0


उस्मानाबाद जिल्ह्यात 3 ठिकाणी मारहाण गुन्हा दाखल 

पोलीस ठाणे, परंडा: वाणेगव्हाण, ता. परंडा येथील पाटील कुटूंबीयांतील 1)फुलचंद 2)यशवंत 3)भालचंद्र 4)सुमित 5)विश्वजीत 6)सुजित 7)चेतन 8)सचिन 9)दुष्यंत 10)प्रताप 11)संग्रामसिंह यांच्या गटाचा गावातीलच- जगताप कुटूंबीयांतील 1)शहाजी 2)शिवाजी 3)सुषेन 4)सुरज 5)विलास 6)बाबुराव यांच्या गटाशी 05 फेब्रुवारी रोजी 10.00 वा. सु. राहत्या गल्लीतच उसतोड संबंधीच्या कारणावरुन वाद झाला. यात दोन्ही गटांतील सदस्यांनी परस्परविरोधी गटांती सदस्यांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, कोयता, कुळवाची फास, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. यावरुन दोन्ही गटांतील सदस्यांनी परस्परविरोधी दिलेल्या स्वतंत्र 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

 

पोलीस ठाणे, लोहारा: भातांगळी, ता. लोहारा येथील किरण मोहण जगताप हे 02 फेब्रुवारी रोजी 15.00 वा. सु. गावतील आपल्या शेतात बांधावर दगड लावत असतांना शेतातील दगड नेल्याच्या कारणावरुन शेजारील शेतकरी पती- पत्नी भरत व अनिता फत्तेपुरे यांनी किरण जगताप यांना शिवीगाळ करुन कत्ती, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या किरण जगताप यांनी 05 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, आनंदनगर: वडीलांना निवृत्ती नंतर मिळणाऱ्या आर्थिक लाभावरुन माणिक चौक, उस्मानाबाद येथील बहिण- भाऊ विजयश्री, भाग्यश्री व श्रीराम सुधाकर मुंबरे यांच्यात वाद आहे. यातुन श्रीराम सुधाकर मुंबरे यांनी 04 फेब्रुवारी रोजी 20.00 वा. सु. राहत्या घरी बहिणी- विजयश्री व भाग्यश्री यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, वायरने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या विजयश्री मुंबरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top