Osmanabad जिल्ह्यात 3 ठिकाणी चोरी गुन्हा दाखल - Theft
पोलीस ठाणे, मुरुम: हाडोंग्री, ता. भुम येथील रामराव गणपती क्षिरसागर यांच्या शेतात बांधलेल्या दोन म्हशी 29 जानेवारी रोजी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या रामराव क्षिरसागर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): वाघोली, ता. उस्मानाबाद येथील ‘हॉटेल न्यु शिवनेरी’ समोर हॉटेल मालक- हरीश्चंद्र गोविंदराव मगर यांनी ठेवलेला अशोक लेलँड टिप्पर क्र. एम.एच. 04 एफके 3214 हा 02- 03 फेब्रुवारी दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेला. अशा मजकुराच्या हरीश्चंद्र मगर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, आनंदनगर: सुलतानपुरा, उस्मानाबाद येथील आकाश शिवाजी थेटे यांच्या राहत्या घराचे कुलूप 30 जानेवारी ते 03 फेब्रुवारी दरम्यान अज्ञाताने नकली चावीने उघडून घरातील लाकडी पेटीत ठेवलेली 80,000 ₹ चोरुन नेले. अशा मजकुराच्या आकाश थेटे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380, 454, 457 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.