दहावी व बारावी च्या लेखी परीक्षेच्या पेपरसाठी कोविडमुळे वेळांमध्ये वाढ
उस्मानाबाद,दि.23(जिमाका):-एप्
शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लेखी परीक्षेतील पेपरची वेळ या परीक्षेसाठी 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे व 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढविण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने एप्रिल-मे 2021 माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी (इ.10वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी (इ.12वी) परीक्षेच्या वेळापत्रकात वेळेमध्ये बदल करुन सुधारित अंतिम वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर दि. 21 मार्च-2021 पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
उपरोक्त लेखी, प्रात्यक्षिक व तत्सम परीक्षांना प्रविष्ठ होणा-या परीक्षार्थ्यांसाठी कोविड 19 विषाणुच्या पार्श्वभूमीवर विशेष मार्गदर्शक सूचना मंडळामार्फत निश्चित करण्यात आलेल्या आहेत. या सूचना मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.परीक्षार्थ्यांनी या विशेष मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावयाचे आहे.