उस्मानाबाद शहरात चालु असलेल्या ड्रेनेज लाईनचे काम निकृष्ट दर्जाचे! , नगर परिषद मुख्याधिकारी वसुधा फड यांना निवेदन

0



उस्मानाबाद शहरात चालु असलेल्या ड्रेनेज लाईनचे काम निकृष्ट दर्जाचे असुन तत्काळ हे काम थाबवुन उद्याला उद्भवणा-या नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करावे.. नगर परिषद मुख्याधिकारी वसुधा फड यांना निवेदन


उस्मानाबाद :- शहरात सर्वत्र ड्रेनेज लाईनचे काम चालु असुन हे काम निकृष्ट दर्जाचे असुन भविष्यात यापासुन नागरिकांची गैरसोय व  आरोग्याच्या समस्या उद्भवणार आहेत.यासाठी हे काम तात्काळ थांबवुन  पुर्णपणे चौकशी व पाहणी करावी.यातील पाईप छोटे व लवचिक आहेत जेणेकरून त्यातुन सांडपाणी जाता येणार नसुन कुठे मुरम,दगड माती असुन हे पाईप जमिनीत टाकताना त्याखाली सिमेंट काँक्रीट चा थर दिला जात नाही,एखाद्या ठिकाणी भुसभुशीत मातीचे रान आहे परंतु हे पाईपलाईन तसेच टाकले जात असून उद्याला तो वापरात आल्यास जमिनीत दबु शकतो व त्यातील घाण पाणी तिथेच लिकेज होऊ शकते,ड्रेनेज चेंबर बांधले जात आहेत, एका दिवसात हे चेंबर बांधुन लगेच मातीने बुजविले जात आहेत त्यावर पाणी मारणे होत नाही. हे पक्के नसल्याने उद्याला ते जमिनीवरील नागरिक,वाहनांच्या रहदारीमुळे फुटून त्यातील घाण पाणी,दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडु शकते.अगोदरच या कामापासुन रस्त्याची दुरावस्था झाली असुन वाहने तर दुरच अगदी नागरिकांना पायी सुद्धा व्यवस्थित जाण्याकरिता रस्ता नाही, कमीत कमी बुलडोझरने त्या दगड गोटे वरुन सपाटीकरण करणे आवश्यक आहे.अशा प्रकारचे लेखी निवेदन नगर परिषद मुख्याधिकारी वसुधा फड मॅडम यांना सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी संबंधित अधिकारी श्री विधाते यांच्याशी चर्चा करुन दिले व यांची एक प्रत जिल्हाधिकारी यांना देण्यात आली 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top