येडाई व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र येरमाळा येथे व्यसनमुक्ती रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न
येरमाळा -येडाई व्यसनमुक्ती केंद्र येरमाळा येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना आपल्या बहिणीची कमतरता भासू नये यासाठी केंद्रातील सर्व महिला कर्मचारी यांनी व्यसनमुक्ती रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.प्रियंका शिंदे यांनी केले. तसेच केंद्राचे मॅनेजर श्री.बापूराव हुलूळे यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व सांगत एक चांगला विचार येणाऱ्या दिवसासाठी अनेक चांगले विचार घेऊन येत असतो असे मार्गदर्शन केले. यावेळी आयुष्यभर निर्व्यसनी राहण्याचा निर्धार केंद्रातील रुग्णांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुमन मोराळे यांनी केले. व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. संदीप तांबारे यांनी केले.