भोगावती नदीपात्राच्या सुशोभिकरणाला गती मिळणार, पालकमत्री प्रा.डॉ.सावंत यांनी घेतली दखल; अ‍ॅड.शिंदे यांनी शहरवासीयांच्या वतीने मानले आभार

0

भोगावती नदीपात्राच्या सुशोभिकरणाला गती मिळणार, पालकमत्री प्रा.डॉ.सावंत यांनी घेतली दखल; अ‍ॅड.शिंदे यांनी शहरवासीयांच्या वतीने मानले आभार 


उस्मानाबाद - 
शहराच्या मध्यभागातून वाहणार्‍या भोगावती नदीपात्राच्या स्वच्छता व सुशोभिकरणाबाबत उस्मानाबाद येथील ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.विश्वजित विजयकुमार शिंदे यांनी दीड हजार नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन दिल्यानंतर पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकार्‍यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत नगर विकास विभागाचे जिल्हा सहआयुक्त सतीश शिवणे यांनी नगर पषिदेच्या मुख्याधिकार्‍यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नदीपात्राच्या स्वच्छतेला गती मिळणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

उस्मानाबाद शहरातील भोगावती नदीपात्राची स्वच्छता करुन दोन्ही बाजूस कायमस्वरूपी कालवा पद्धतीच्या भिंती बांधून कायम स्वरूपी स्वच्छतेची व्यवस्था करणे बाबत शरहातील नागरीकाचे सहयाचे निवेदन उस्मानाबादचे ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. विश्वजीत विजयकुमार शिंदे यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांना दि. 26 जानेवारी 2023 रोजी दिले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज साळुंके, जिल्हाध्यक्ष दत्ता साळुंके, अनिल खोचरे, आनंद सतीशराव पाटील, सनी पवार, हरी शिंदे व प्रणिल रणखांब उपस्थित होते. त्यांनीही भोगावती नदी स्वच्छतेसाठी अ‍ॅड. शिंदे यांच्या निवेदनाच्या अनुुषंगाने पालकमंत्री महोदयांना अवगत केले. याची दखल घेत पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत यांनी दखल घेऊन जिल्हाधिकारी व नगर विकास प्रशासन यांना प्रचलित कायदे व नियमानुसार कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहेत. याबाबत उस्मानाबाद जिल्हा नगर विकास विभागाचे जिल्हा सहआयुक्त सतीश शिवणे यांनी दि. 30/1/2023 रोजी नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना तातडीचे पत्र पाठवून आदेशित केले. पालकमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार कार्यवाही करुन अहवाल सादर करावा त्यांनी असे आदेशित केले आहे. 

भोगावती नदीपात्राची स्वच्छता होऊन उस्मानाबादकरांना चांगले पर्यावरण व आरोग्य लाभेल अशी आशा अ‍ॅड. विश्वजीत शिंदे यांनी व्यक्त केली आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावल्याबद्दल पालकमंत्री प्रा. डॉ.तानाजीराव सावंत यांचा अ‍ॅड. विश्वजित शिंदे यांनी सत्कार करुन आभार व्यक्त केले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे दोन्ही जिल्हाध्यक्ष सुरज साळुंके, दत्तात्रय साळुंके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top