खामसवाडी जिल्हा परिषद गटातून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, भाजपा युवा नेते शंतनू पायाळ यांनी उमेदवारी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कोणत्याही दबावाखाली नसून, भारतीय जनता पक्षाच्या धोरणांवर तसेच मा. आ. राणा दादा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर संपूर्ण विश्वास ठेवून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की राजकारण हे पदासाठी नसून जनसेवेसाठी असते, या भूमिकेतूनच मी सुरुवातीपासून काम करत आलो आहे. जनतेसाठी घेतलेले जनसेवेचे व्रत यापुढेही तितक्याच प्रामाणिकपणे आणि तळमळीने सुरू ठेवणार असून, या निर्णयामुळे माझ्या कार्यात कुठेही खंड पडणार नाही.
माझ्यावर आजवर जनतेने, कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी दाखवलेला विश्वास, दिलेला पाठिंबा आणि ताकद हीच माझी खरी संपत्ती आहे. यापुढेही रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांना रोजगार, वैद्यकीय सेवा, उद्योग, आणि इतर अडचणी दूर करण्यासाठी ठोस प्रयत्न सुरूच राहतील. जिल्ह्यातील युवकांचे प्रश्न, रोजगार, विकास आणि लोकहित या मुद्द्यांवर मी सातत्याने काम करत राहणार आहे.
जनतेच्या विश्वासावर आणि भाजप परिवाराच्या संघटनात्मक बळावर भविष्यातही सामाजिक व विकासात्मक कार्य अधिक प्रभावीपणे करण्याचा माझा ठाम संकल्प आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त जागा जिल्हा परिषदेवर व पंचायत समितीवर नक्कीच निवडून येथील आणि त्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत.


