google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 लातूर जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार ऐतिहासिक कवायत सादरीकर सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांचे राष्ट्रभक्तीपर गीतावर आधारित कवायत संचलन

लातूर जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार ऐतिहासिक कवायत सादरीकर सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांचे राष्ट्रभक्तीपर गीतावर आधारित कवायत संचलन

0
लातूर जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार ऐतिहासिक कवायत सादरीकरण

▪️सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांचे राष्ट्रभक्तीपर गीतावर आधारित कवायत संचलन

लातूर, दि. २३ : जिल्ह्यात २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रभक्तीपर गीतावर आधारित भव्य कवायत सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळी जिल्हास्तरीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांचे एकत्रित कवायत संचलन सादर केले जाणार आहे. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होत आहेत.

या कार्यक्रमास पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. दत्तात्रय मठपती, शिक्षणाधिकारी प्राथमिक तृप्ती अंधारे तसेच मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील इतर नऊ तालुक्यांमध्ये देखील ध्वजवंदनानंतर स्वतंत्रपणे कवायत आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शासकीय, खासगी, अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधून विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top