सावधान ! कंजंक्टिवायटिस काढतोय डोके वर
डोळ्यांच्या या आजाराची जाणून घ्या लक्षणं व प्रतिबंधात्मक उपाय , Conjunctivitis
उस्मानाबाद,दि.07( osmanabadnews ):- कंजक्टिवायटिसचा संसर्ग प्रामुख्याने वातावरणामध्ये बदल झाल्याने होतो आणि बॅक्टेरिया किंवा वायरस सारख्या सुक्ष्म जीवाणूमुळे हा आजार फैलावतो. सध्या पावसाळयाचे दिवस डोळयांच्या आजाराचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहेत. या दिवसात डोळयांची साथ येणारे अनेक लोक सापडत आहेत. तुर्तास डोळयांच्या आजारासंदर्भात नवीन आजार समोर आला आहे. तो म्हणजे सुक्ष्म जिवाणूमुळे होणारा होतो. या आजारामध्ये कंजक्टीवा म्हणजेच डोळयांच्या कंजक्टिवायटिस हा आजार बॅक्टेरिया किंवा वायरस मुळे पांढऱ्या भागावरती असलेल्या पातळ उतींची आणि पापणीच्या आतल्या दाह होण्याची शक्यता असते.
कंजक्टिवायटिस हा डोळयांचा आजार कोणालाही होऊ शकतो.
डोळे येणे हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे जो विशेषत: पावसाळयात होतो कधी दोन्ही डोळयावरही त्यांचा संसर्ग होतो. डोळयांना खाज, चिकटपणा, डोळयांना सूज, डोळे लालसर होणे, डोळयातून पिवळा द्रव बाहेर येणे. अशी लक्षणे दिसतात. हा रोग 5 ते 7 दिवसात बरा होतो.
लक्षणे : डोळयांना खाज येणे, डोळे लाल होणे व सुज येणे,डोळे चिकटणे,डोळयातून घाण चिकट पाणी येणे,डोळे आले की काय करावे :वारंवार हात साबण, सूनिटायझरने धुवावेत, चेहरा व डोळे स्वच्छ पाण्याने धुवावा, टिश्यू पेपर अथवा निर्जंतुक कापसाच्या बोळयाने डोळे पुसावे, स्वच्छ ठेवावे. गॉगल अथवा चष्मा वापरावा. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा कचऱ्यामुळे त्यावर माशा बसतात. ज्या डोळ्यांची साथ पसरवतात,डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधी घ्यावीत,डोळे आले की काय करु नये :-डोळयांना स्पर्श करु नये,डोळा खाजवू अथवा चोळू नये.बाधित व्यक्तीने रुमाल, टॉवेल, कपडे अथवा चादर सामाईक वापरु नये,एकमेकांशी संपर्क टाळावा. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये.
आपल्या वस्तु उदा. मोबाईल, चाव्या, पेन आदी शेअर करु नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी वापरु नये,प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये स्तरावर यासाठी आवश्यक ती सर्व औषधे व उपचार उपलब्ध आहेत तरी कोणालाही याबाबत त्रास असल्यास नजिकच्या आरोग्य केंद्रात जाऊन औषधोपचार घेऊन डोळयांची दृष्टी जाणे यासारख्या गुंतागुत निर्माण होण्याची वेळ येऊ देऊ नका. सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. आर. ढाकणे यांनी सांगितले.
संसर्ग जाई पर्यंत दररोज उशीची खोळ बदलावी. डोळयातील स्त्राव स्टराईल गॉजच्या मदतीने पुसावा. हा आजार प्रामुख्याने व्यक्तिकडे सहज पसरु शकतो. पण चिंता करु नये हा आजार फक्त शरीर संपर्काद्वारे आणि खाव संपर्काद्वारे फैलू शकतो. जर तुम्हाला यासंबंधित काही लक्षणे दिसल्यास वेळीच डॉक्टरांना संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरिदास यांनी केले.