ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी कोनेरी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य सदस्य अजित खोत

0

ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी कोनेरी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य सदस्य अजित खोत



Osmanabadnews : उस्मानाबाद तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ढोकी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ . प्रणिती कोनेरी यांच्या निष्काळजीपणामुळे तरुण प्रकाश कावळे या आपघात ग्रस्थाचा औषोधोपचाराविना मृत्यू  झाले प्रकरणी चौकशी करून डॉ . प्रणिती कोनेरी निलंबीत करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करणे बाबत आज आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य सदस्य अजित खोत यांनी पालकमंत्री,जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.


 या निवेदनात  कावळेवाडी गावातील प्रकाश सदाशिव कावळे यांचा दि . ०६/०८/२०२३ रोजी दुपारी १ ते १ . ३० वा . दरम्यान तेरणा कारखान्यासमारे कावळेवाडी पाटीलगत चारचाकी वाहनाने पाठीमागुन घडक दिल्याने आपघात झाला होता . त्या अपघातात त्याला गंभीर जखमा झालेल्या होत्या सदर आपघातानंतर प्रकाश कावळे या पेशंटला उपचारासाठी चारचाकी वाहनाने वैभव खोत , अशोक वीर , सचिन कावळे , विनोद कावळे , महादु कावळे यांच्यासह इतरांनी प्राथमिक आरोग्य केंद्र ढोकी येथे उपचारासाठी नेले असता , डयुटी वैद्यकीय अधिकारी डॉ . प्रणिती कोनेरी या प्रा.आ. केंद्रामध्ये हजर नव्हत्या त्यामुळे आपघातग्रस्त प्रकाश कावळे यांना कोणत्याही प्रकारचा औषोधोपचार मिळाला नाही . तसेच त्यांना नेण्यात आलेल्या वाहनातुन सुमारे २० मिनीट खाली देखील उतरून घेण्यात आले नाही हा सर्व प्रकार केवळ वैद्यकीय अधिकारी डॉ . गैरहजर असल्यामुळे घडलेला आहे . वास्तविक डॉ प्रणिती कोनेरी यांनी दावाखण्यात ड्युटीवर असताना देखील त्यांनी कुठल्याही पध्दतीची रजा किंवा मुख्यालय सोडण्याची वरिष्ठांची परवानगी घेतलेली नसताना त्या गैरहजर होत्या.


 त्यामुळे सदर अपघातग्रस्त प्रकाश कावळे याचेवर वेळेत उपचार न झाल्याने त्यांचा उपचाराविना मृत्यू झाला . या संपूर्ण घटनेस डॉ . प्रणिती कोनेरी या जबाबदार आहेत . तरी प्रकरणी चौकशी करून डॉ . प्रणिती कोनेरी यांचेवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी अजित खोत यांनी केली आहे अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top