जिल्हा कोषागार कार्यालय येथील लेखा लिपिक तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात

0
धाराशिव : तक्रारदार - पुरुष,वय 59 वर्षे यांच्या तक्रारीवरून  आरोपी  -अनंता सखाराम कानडे वय-29 वर्षे, पद-लेखा लिपीक, निवृत्ती वेतन शाखा, जिल्हा कोषागार कार्यालय, धाराशीव.( वर्ग03) यांनी लाच मागणी दि. 28/05/2024 रोजी लाच मागणी रक्कम - 3000/-रुपये- करुन लाच स्विकारली रक्कम -3000/- रुपये स्वीकारली आहे ‌अशी माहिती लाच लुचपत प्रतिबंध विभाग धाराशिव यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

थोडक्यात हकिकत - यातील तक्रारदार हे सेवानिवृत्त पोलीस हवालदार आहेत.तक्रारदार यांचे सेवा निवृत्ती वेतन मंजुरी प्रस्ताव व पेन्शन विक्रीचे बिल कोषागार कार्यालय धाराशिव येथे प्रलंबित आहे. सदर बिलाची पडताळणी करून सदरचे बिल ऑडिट टेबलला पाठवण्यासाठी यातील आरोपी  लोकसेवक  अनंता सखाराम कानडे वय-29 वर्षे याने तक्रारदार यांचेकडे पंच साक्षीदारा समक्ष  3000/- रुपयेची लाचमागणी करुन 3000/- रु. लाच रक्कम पंच साक्षीदारासमक्ष स्वतः स्वीकारली आहे .आरोपी लोकसेवक यास ताब्यात घेण्यात आले असून त्याचे विरुद्ध आनंदनगर पोलीस ठाणे, जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे‌. अशी माहिती धाराशिव लाच लुचपत प्रतिबंध विभागाने प्रसार माध्यमांना दिली आहे.

 हि कारवाई सापळा अधिकारी नानासाहेब कदम, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव मो. क्र. 9922207499 , पर्यवेक्षण अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव मो. क्र. 9594658686,  मार्गदर्शक - मा. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर .मो.न. 9923023361 , मा. मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर  मो.नं. 98814 60103 ,  सापळा पथक - पोलीस अमलदार सिध्देश्वर तावसकर,विशाल डोके, अविनाश आचार्य, आशिष पाटील यांनी केली आहे.

लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा
कार्यालय 02472 222879
टोल फ्री क्रमांक.1064

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top