धाराशिव : आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला चिलवडी परिसरात मोठे खिंडार पडले आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि चिलवडीचे माजी सरपंच शाम जाधव यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार पाटील यांनी शामभैय्या जाधव यांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत केले आणि त्यांच्या आगामी सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जाधव यांच्या भाजप प्रवेशामुळे चिलवडी व परिसरात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
या प्रवेश सोहळ्याप्रसंगी सुरेश देशमुख, नितीन काळे, नेताजी पाटील, नितीन भोसले, दत्ता देवळकर, राजाभाऊ पाटील, बालाजी गावडे यांसह चिलवडी आणि परिसरातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. विकासकामांचा धडाका आणि पक्षाची ध्येयधोरणे पाहून आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे यावेळी शाम जाधव यांनी नमूद केले.


