google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 चेन्नई–सुरत ग्रीन फील्ड महामार्गासाठी संपादित जमिनींना वाढीव व न्याय्य मोबदला द्यावा : डॉ. प्रतापसिंह पाटील

चेन्नई–सुरत ग्रीन फील्ड महामार्गासाठी संपादित जमिनींना वाढीव व न्याय्य मोबदला द्यावा : डॉ. प्रतापसिंह पाटील

0


चेन्नईसुरत ग्रीन फील्ड महामार्गासाठी संपादित जमिनींना वाढीव  न्याय्य मोबदला द्यावा : डॉप्रतापसिंह पाटील

धाराशिव प्रतिनिधी – चेन्नईसुरत ग्रीन फील्ड महामार्गासाठी धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येत आहेतमात्र या जमिनींसाठी जाहीर करण्यात आलेला मोबदला अत्यल्प  अन्यायकारक असल्याची तीव्र भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहेसध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत प्रशासनाने निश्चित केलेले दर समाधानकारक नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे जिल्हाध्यक्ष डॉप्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी व्यक्त केले आहे.

डॉपाटील यांनी सांगितले कीमहामार्गाच्या कामासाठी संपादित होणाऱ्या अनेक जमिनी बागायती स्वरूपाच्या असून त्या ठिकाणी ऊसफळबागा तसेच इतर कायमस्वरूपी पिके आहेतमात्र जमिनीचा दर्जापिकांची किंमत आणि भविष्यातील उत्पादनक्षमतेचा योग्य विचार  करता मोबदला निश्चित करण्यात आल्याचे दिसून येत आहेत्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींच्या खरी किंमतीपेक्षा कमी मोबदला मिळत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.

तसेच महामार्गामुळे अनेक शेतजमिनी दोन्ही बाजूंनी विभागल्या जाणार असून त्यामुळे शेती करणे अधिक कठीण होणार आहेकाही ठिकाणी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्तेपाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सोयींची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहेत्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून संबंधित शेतकऱ्यांना योग्य दरासह वाढीव मोबदला देणेतसेच पुनर्वसन  आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे डॉपाटील यांनी नमूद केले.

या संदर्भात डॉप्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देऊन या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहेसंबंधित विभागाशी समन्वय साधून शेतकऱ्यांना न्याय्य  वाढीव मोबदला मिळावा यासाठी तात्काळ कार्यवाही करावीअशी मागणी त्यांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top