उस्मानाबाद जिल्ह्यात नऊ ठिकाणी जुगार विरोधी कारवाई
भुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीसांनी दि.30.08.2023 रोजी 12.30 वा. सु. भुम पो.ठा. हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे -1) आकाश बबन टकले, वय 28, रा. गालिबनगर भुम ता. भुम जि. उस्मानाबाद, हे भुम ते जामखेड रोडलगत पाथरुड चौक येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 740 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर आरोपी नामे 2) शंकर शहाजी पाळुळे, वय 24 वर्षे, रा. वालवड ता. भुम जि. उस्मानाबाद हे सिध्दीविनायक जनरल नावाचे दुकानासमोर आनंदनगर येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 1,150 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये भुम पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
येरमाळा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.30.08.2023 रोजी 13.30 वा. सु. येरमाळा पो.ठा. हद्दीत येडेश्वरी मंदीर परीसरात भेले प्रसाद दुकानाचे समोर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे -1) रमेश मत्या काळे, वय 50 वर्षे, रा. पारधी पिडी तेरखेडा ता. वाशी जि. उस्मानाबाद, हे येडेश्वरी मंदीर परीसरात भेले प्रसाद दुकानाचे समोर सुरट मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 360 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान ढोकी पोलीसांनी दि.30.08.2023 रोजी 11.45 वा. सु. ढोकी पो.ठा. हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे -1) राजेंद्र दादाराव ढवारे, वय 65, रा. ढोकी, ता. जि. उस्मानाबाद, हे ढोकी बस स्टन्डॅ समोर मोकळ्या जागेत कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 7,520 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर आरोपी नामे 2) संजय गोविंद चौधरी, वय 47 वर्षे, रा. वाकरीवाडी ता. जि. उस्मानाबाद हे ढोकी पेट्रोल पंप चौक तेर रोडवर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 550 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये ढोकी पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
वाशी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान वाशी पोलीसांनी दि.30.08.2023 रोजी 13.30 वा. सु. वाशी पो.ठा. हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे -1) विजय शिवाजी शेरकर, वय 41, रा. वाशी ता. वाशी जि. उस्मानाबाद, हे पारगाव येथील महाराष्ट्र बॅक शेजारी कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 620 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर आरोपी नामे 2) दत्तात्रय बाबुराव भराटे, वय 40 वर्षे, रा. पारा ता. वाशी जि. उस्मानाबाद हे पारा मुख्य चौक येथील मनो अण्णासाहेब गुजर यांचे पत्रयाचे शेडसमोर सुरट मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 550 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये वाशी पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
आनंदनगर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलीसांनी दि.30.08.2023 रोजी 17.50 वा. सु. आनंदनगर पो.ठा. हद्दीत सिध्दीविनायक जनरल नावाचे दुकानासमोर आनंदनगर येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे -1) रोमीन नानासाहेब गुळवे, वय 23 वर्षे, रा. आनंदनगर ता. जि. उस्मानाबाद, हे सिध्दीविनायक जनरल नावाचे दुकानासमोर आनंदनगर येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 820 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान मुरुम पोलीसांनी दि.30.08.2023 रोजी 20.30 वा. सु. मुरुम पो.ठा. हद्दीत सुदंरवाडी गावात देवी मंदीराजवळील मोकळ्या जागेत सुदंरवाडी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे -1) दुधाराम गुंडू सगर, वय 47 वर्षे, रा. सुंदरवाडी, ता. उमरगा जि. उस्मानाबाद, हे सुदंरवाडी गावात देवी मंदीराजवळील मोकळ्या जागेत सुंदरवाडी ता उमरगा येथे मिलन नाईट मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 200 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.