कृषि उत्पादन तंत्रज्ञानाशी संबंधित फायदेशीर अॅप्स माहिती उपक्रम कार्यक्रम संपन्न
दि. २८/०८/२०२३ शेकापूर गावातील स्थानिक शेतकऱ्याना शासकीय कृषी महाविद्यालय उस्मानाबाद येथील विद्यार्थी - ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजना Student READY Programme अंतर्गत विद्यार्थी इमादउद्दीन खान, सुमित पारसकर, ऋतु ऐस कुमार, श्रेयस ऐम. बि, प्रभंज कुमार, सुबिन कृष्णन के, बिनिल राणा के. वि., अक्षय पाटिल यांच्या RAWE व्हिलेज अटॅचमेंट पार पाडण्यासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. राघवेंद्र पाटील, कार्यक्रम समन्वयक डॉ. किरण थोरात, प्राचार्य डॉ. के. आर. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी ॲप विषयी माहिती देऊन त्याचे महत्त्व सांगण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना शेती पद्धती वाढविने, हवामान अंदाज बांधणे, माती आरोग्य निरिक्षण करणे , बाजारभाव आणि कीटक नियंत्रण करणे इत्यदी संदर्भात असणारे ॲप चे महत्व आणि त्याची कार्य प्रणाली समजावून सांगण्यात आली.