धाराशिव- धाराशिव जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सततच्या पावसामुळे नद्या, नाले व ओढे तुडुंब भरले असून, काही गावांमध्ये पाणी घुसल्याने शेतजमीन, पिके व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद पडले असून या परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने पुरग्रस्त गावांचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी,रस्ते व पूल दुरुस्तीची तातडीने कामे हाती घ्यावीत,आपत्ती व्यवस्थापन बचावकार्य पार पाडावे अशा उपाययोजना तात्काळ राबवण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री,उप मुख्यमंत्री,कृषिमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.