संजयभाऊ राठोड यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी.
धाराशिव (प्रतिनिधी) –
बंजारा समाजातील होतकरू, हुशार आणि आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल उचलत, मृद व जलसंधारण मंत्री तथा बंजारा समाजाचे खंदे नेते मा. ना. श्री. संजयभाऊ राठोड यांनी “मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना ३.०” ची घोषणा केली आहे.
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे. दिग्रस, दारव्हा व नेर मतदारसंघातील ४०० विद्यार्थ्यांना यापूर्वी या योजनेचा लाभ मिळाला असून, यंदा ही सुवर्णसंधी राज्यातील सर्व बंजारा समाजातील विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली आहे.
योजनेची मुख्य वैशिष्ट्ये
१००० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹१०,००० ची आर्थिक मदत
मोफत ऑनलाइन क्लासेस व मार्गदर्शन
मोफत अभ्यास साहित्य
पात्रता
किमान १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक
पात्रता चाचणी (स्पर्धा परीक्षा) देणे बंधनकारक
नोंदणी कालावधी
२० ऑगस्ट २०२५ दरम्यान विद्यार्थी नोंदणी करू शकतात.
या योजनेचा उद्देश केवळ शिष्यवृत्ती देण्यापुरता मर्यादित नसून, बंजारा समाजातील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, शिक्षण आणि स्वावलंबनाचा मार्ग दाखवणे हा आहे. संजयभाऊ राठोड यांच्या दूरदृष्टीमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख मिळणार आहेत.
“आपण आपल्या गावातील, परिसरातील व समाजातील प्रत्येक गरजू विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचवून त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे,” असे आवाहन सचिन राठोड, धाराशिव यांनी केले आहे.
ही योजना बंजारा समाजाच्या शैक्षणिक इतिहासात एक नवा अध्याय लिहिणारी ठरणार असून, समाजाला सशक्त, सुशिक्षित आणि यशस्वी बनविण्याकडे एक मोठे पाऊल आहे.
सचिन राठोड यांचे बंजारा समाजाला अहवान..