तेरखेडा येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व खाऊ चे वाटप

0




उस्मानाबाद/ तेरखेडा येथील सचिन उकरंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व खाउचे वाटप करण्यात आले.सचिन उकरंडे या तरुणाने बॅनर व वाढदिवसानिमित्त होणारा अवाजवी  खर्च टाळत चिमुकल्या विद्यार्थ्यांना 500 स्कूल बॅग व खाऊ चे वाटप करण्यात आले.
यापुढे देखील वाढदिवसानिमित्त असेच सामाजिक कार्य करणार असल्याचे सचिन उकरंडे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्रीराम क्षिरसागर यांनी केले.ह्या कार्यक्रमावेळी गटविकास शिक्षण अधिकारी श्री. बन गावातील सरपंच दिलीप घोलप, उपसरपंच फरीद पठाण, ज्येष्ठ नेते बिभिषण खामकर, बाबुराव घुले, रणजित घुले, बालाजी घोलप, धनाजी मस्के, नारायण खापे, गणेश घुले, रामलिंग शिंदे, ग्रामपंचायत सदस्या छाया उकरंडे, बार्शी येथील सामाजिक कार्यकर्ते धनुभाऊ धावारे तसेच प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक वृंद तसेच गावातील ईतर ज्येष्ठ नेते मंडळी व सचिन उकरंडे यांचे मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्कूल बॅग व खाऊचे वाटप केल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपसरपंच फरीद पठाण यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top