उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !

0

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !

भूम, वाशी व परंडा तालुक्यातील २० ग्रामपंचायतचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, सदस्यांचा प्रवेश 

उस्मानाबाद दि.१६ (प्रतिनिधी) - जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून भूम, परंडा व वाशी मतदारसंघात तब्बल २० ग्रामपंचायतच्या सरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, ठाकरे सेनेचे शाखाप्रमुख यांच्यासह शेकडो जणांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते व जय हनुमान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कांबळे यांच्या उपस्थितीत पुणे येथील संपर्क कार्यालयात दि.१६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप घडवून आणून खरोखरच प्रस्थापितांना जबर हादरा देण्यात पालकमंत्री प्रा सावंत यशस्वी ठरले आहेत. 


शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून जिल्ह्यात शिवसेनेतील कार्यकर्त्यांचा शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) मध्ये प्रवेश करण्याचा ओढा लागलेला असून शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या देखील काही नेत्यांना गळाला लावले आहे. तर आज मोठ्या दिमाखात प्रवेश केलेल्या ग्रामपंचायत सरपंचामध्ये वरुड बुरुडवाडी ग्रामपंचायतचे सरपंच अविनाश चोरमले, संपत शिंदे, सुकटा ग्रामपंचायतचे अशोक गायकवाड, रत्नापूर ग्रामपंचायतचे दत्ता देवकर, भालचंद्र सावंत, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी सदस्य बाळासाहेब मोटे, घाटनांदुरचे सरपंच रमेश पवार, माजी सरपंच बजरंग गोयल, संजीव हुंबे, वंजारवाडीचे लहू मोटे, शेषराव बर्वे, शिवाजीराव खरात, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायतचे तुकाराम बरकडे, मात्रेवाडीचे ठाकरे सेनेचे शाखाप्रमुख दिलीप पवार, संतोष खंडागळे, दत्तात्रय खंडागळे, वाकोडचे ‌बिरमल शेळके, विविध कार्यकारी सोसायटीचे राम पाटील, लहू मासाळ, सांडसांगवीचे तानाजी देवकते, अमोल पाटील, आप्पासाहेब शेंबडे, डुक्करवाडीचे गोवर्धन मासाळ, माजी सरपंच हौसेराव माने, सोनगिरीचे सरपंच सतीश मारकड, बावी ग्रामपंचायतचे तात्यासाहेब ठोंबरे यांच्यासह वीस ग्रामपंचायत च्या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन माजी चेअरमन सदस्य व ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह शेकडो सदस्यांनी जाहीर प्रवेश केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top