ओबीसींची नवी आघाडी स्थापन करणार : श्रावण देवरे
स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण ओबीसींना मिळालेले नाही त्यामुळे लवकरच ओबीसींची नवी आघाडी स्थापन करणार असल्याचे स्पष्ट मत सत्यशोधक विचारवंत तथा ओबीसी व्याख्याते श्रावण देवरे यांनी व्यक्त केले ते समर्थ मंगल कार्यालय येथे आयोजित सकल ओबीसी जागर मेळाव्याप्रसंगी बोलत होते यावेळी व्यासपीठावर महादेव खटावकर, भीमराव दळे,शरद कोळी,नागोराव पांचाळ,धनंजय शिंगाडे,राजेश पंडित, कल्याण कुंभार,महादेव माळी,बंडू ताटे,बालाजी गावडे,जयराम चव्हाण, मन्मथ आवटे,मनोज माळी उपस्थित होते
पुढे बोलताना देवरे म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण ओबीसींना मिळालेले नाही १९९३-९४ साली घटनादुरुस्ती करून अधिकृतपणे संविधानामध्ये कायदा म्हणून त्याच्यात सामाविष्ट केले गेले आजही ओबीसींच्या हक्काचे आरक्षण सर्वोच्च न्यायालय नाकारू शकत नाही किंवा कुठलेही राजकीय पक्ष नाकारु शकत नाही परंतु आपल्याकडे राजकीय पक्ष,सुप्रीम कोर्ट हे वरच्या जातीचे असल्यामुळे ते ओबीसी एससी एसटी यांच्याकडे आकस भावनेने बघत आहेत आणि आरक्षण कसे नष्ट होईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत स्थानिक स्वराज्य संस्था संस्था मधून ओबीसींच्या हक्काचे आरक्षण सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि सर्व राजकीय पक्षांची एकजूट या दोघांनी मिळून ओबीसींचे आरक्षण समाप्त केले आहे यापुढील निवडणुका ओबीसी शिवाय होत आहेत ओबीसी आरक्षण संपलेला आहे ते मिळविण्यासाठी आंदोलनाशिवाय दुसरा मार्ग नाही
प्रस्थापित राजकीय पक्षांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजपा मनसे यांनी एकत्र येऊन षडयंत्राचा घाट घातला असल्याने सर्व ओबीसी जनतेने किंवा समाजाने या राजकीय पक्षांवर बहिष्कार घातला पाहिजे राजकीय पक्षाच्या तिकिटावर एकाही ओबीसी ने निवडणूक लढवायला नकार देऊन ओबीसींची एक स्वतंत्र राजकीय शक्ती उभा करून अस्तित्व आणि आपल्या ओबीसींचा स्वाभिमान दाखवून दिला पाहिजे व संवैधानिक जो हक्क आहे तो आपल्याला मिळवायला हवा त्यासाठी स्वाभिमान हा एकच मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले
निवेदन देऊन किंवा भीक मागून आरक्षण मिळणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला स्वाभिमानाचा हक्काचा लढा उभा करावा लागणार आहे त्यासाठी महाराष्ट्रभर तयारी चालू असून प्रत्येक ठिकाणी तरुण भेटल्यानंतर स्वतः काहीतरी राजकीय अस्तित्व असले पाहिजे या पाच पक्षांना आपण धडा शिकवू अशी इच्छा बोलून दाखवत आहेत त्यामुळेच लवकरच ओबीसींची नवी आघाडी स्थापन झालेली असेल त्यानंतरच्या पुढच्या निवडणुका ह्या ओबीसी राजकीय आरक्षणातर्फे लढवल्या जातील याची खात्री देतो असे त्यांनी उपस्थितांना देवरे यांनी आश्वासित केले