वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक भान जोपासत आशाताई कांबळेंनी शासकीय रुग्णालयात पाच बेडचे केले दान..
उस्मानाबाद :- सन २०२० मध्ये आशाताई कांबळे कोरोना पाॅझिटिव्ह निघाल्या, रुग्णालयात उपचारासाठी बेड शिल्लक नव्हते, जमीनीवर बसुन उपचार त्यांनी घेऊन शेजारील रुग्णांना दिलासा देत मनाशी ठरवले कि आपण बरे झाल्यावर या शासकीय रुग्णालयात बेड दान करायचे आणि त्यांनी आज दि.१३ डिसेंबर रोजी स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शासकीय रुग्णालयात पाच बेड,गादी,ब्लॅंकेटसह मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण केले,विशेष म्हणजे आशाताई कांबळे या अपंग आहेत त्यांनी यापुर्वीही अनेक सामाजिक कार्यात सहभाग नोंदविला आहे,त्यांच्या रुग्ण सेवा कार्याबद्दल अनेकांनी कौतुक केले.मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर त्यांच्या कार्यावरती काव्य रचना देखिल केली,हा कार्यक्रम शासकीय रुग्णालय नवी ईमारती समोर घेण्यात आला,यात प्रामुख्याने रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ साहेब,नगर सेवक तथा डिपीडिसी सदस्य सिध्दार्थ दादा बनसोडे, नगरसेवक युवराज बप्पा नळे,डिडिआर प्रशासकीय अधिकारी मा.महादेव अंबिलपुरे,काॅग्रेस ओबिसी नेते धनंजयजी राऊत, सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे,काॅग्रेस नेते अंकुश पेठे,शांतीरत्न वाघमारे,चांद शेख,,कविता काळे,रतन चव्हाण,वर्षा भोसले,मिनाक्षी मोटे,संध्या तेरकर,शारदा गलंड,अधिसेविका,सिस्टर, ब्रदर अन्य इतर व अपंग संघटनेचे मान्यवर उपस्थित होते.