लोहारा नगरपंचायत निवडणूकीत १० जणांनी घेतले उमेदवारी अर्ज मागे १३ जागा साठी ४४ उमेदवार रिंंगणात
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा नगरपंचायतच्या सोमवारी १३ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १० जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतली आहे. अशी माहीती निवडणूक निर्णय अधिकारी राजकुमार माने यांनी दिली आहे.
ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे नगरपंचायतच्या ४ जागा वगळून उर्वरित १३ जागेसाठी निवडणूक होत आहे.
प्रभाग १ मधून कोंडाबाई चपळे,प्रभाग ३ मधून श्रीशैल्य स्वामी, प्रभाग ५ मधून स्वप्निल माटे,प्रभाग ६ मधून फिरोजाबी सुंबेकर व वर्षाराणी लांडगे,प्रभाग ९ मधून महानंदा घोंगडे, रेणुका घोंगडे व आरती कोरे, प्रभाग १२ मधून जनक कोकणे व विकास नारायणकर या १० जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता १३ जागेसाठी ४४ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.