शिवसेनेचे आजी - माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी , विभागप्रमुख, गणप्रमुख यांच्याशी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या संवाद
उमरगा : आज शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत उमरगा - लोहारा तालुक्यातील शिवसेनेचे आजी - माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी , विभागप्रमुख, गणप्रमुख यांच्याशी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी
संवाद साधला. "शासन आपल्या दारी" योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी शिवसैनिकांनी घरोघरी जाऊन शासकीय योजनांचा प्रचार - प्रसार करावा असे आवाहन यावेळी आ.चौगुले यांनी केले. पक्ष निरीक्षक नितीन लांडगे यांच्या उपस्थितीत आयोजित या बैठकीस युवा नेते किरणजी गायकवाड, बाजार समितीचे मा. सभापती मोहयोद्दिन सुलतान, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे परमेश्वर, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी योगेश तपसाळे यांची उमरगा शिवसेना शहरप्रमुख, राजेंद्र शिंदे पाटील यांची उपतालुकाप्रमुख, सुरेश मंगरुळे यांची मुरूम शिवसेना शहरप्रमुख या पदांवर नेमणुक करण्यात आली. तसेच लोहारा खुर्द ता.लोहारा येथील सरपंच श्री.सचिन रसाळ व मुरूम येथील युवा कार्यकर्ते दत्ता खरटमोल यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
कार्यक्रमास उमरगा शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, लोहारा तालुकाप्रमुख जगन पाटील, डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे आनंद मगर, शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक विलास भगत, उपतालुकाप्रमुख व्यंकट पाटील, शेखर पाटील, दिपक जोमदे, परवेज तांबोळी, अनिल बायस, संदीपान बनकर, परमेश्र्वर साळुंखे, माजी गटनेते अभिमान खराडे, लोहारा नगरसेवक अविनाश माळी, अमीन सुंबेकर, गौस मोमीन व प्रमोद बंगले, ओम कोरे, दिपक रोडगे, आयुब शेख व उमरगा माजी नगरसेवक संतोष सगर, पंढरीनाथ कोणे, सचिन जाधव, शरद पवार, अमृत वरनाळे, भगत माळी, संदीप चौगुले, अमर शिंदे, हणमंत गुरव, हणमंत कोकाटे, माधव जाधव, सुरेश देशमुख, वैभव पवार, श्रीशैल ओवांडे, विनोद मुसांडे, अरुण जगताप, नाना मदनसुरे, अमोल सोमवंशी, यांच्यासह शिवसेना , युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.