तिरुअनंतपुरम येशील चौथ्या नॅशनल स्पर्धेत पो.ह.आसिफ मुजावर यांना लांब उडी व तिहेरी उडी मध्ये दुहेरी पदक - जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

0
तिरुअनंतपुरम येशील  चौथ्या नॅशनल स्पर्धेत पो.ह.आसिफ मुजावर यांना लांब उडी व तिहेरी उडी मध्ये दुहेरी पदक - जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

    सोलापूर  : तिरुअनंतपुरम ( केरळ ) येथे  पार पडलेल्या मास्टर्स गेम्स असोसिएशनच्या  राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेत 
लांब उडी मध्ये सोलापुरातील जेलरोड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हवालदार आसिफ महिबूब मुजावर (बक्कल नंबर  277 )यांनी प्रथम क्रमांक मिळवीत सुवर्णपदक पटकाविले आहे  तर तिहेरी उडी प्रकारात कास्य पदक मिळवीले आहे . या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी दुहेरी पदकाची कमाई करून सोलापूर पोलीस दलाचे नावलौकिक  केलेले आहे . 
दि .18  ते 22 मे 2022 दरम्यान  तिरुअनंतपुरम  ( केरळ ) येथे या राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या .त्यामध्ये लांब उडीमध्ये प्रथम क्रमांक  व तिहेरी उडी मध्ये कास्य पदक  प्राप्त केल्याने पुढे जापान येथे होणाऱ्या वर्ल्ड मास्टर गेम सिनियर ऑलिंपिक साठी त्यांची निवड करण्यात आली आहे .


पो.ह.आसिफ मुजावर यांना यापूर्वी अनेक वेळा राष्ट्रीय व राज्य स्तरावरील सुवर्णपदके मिळालेले आहेत . या यशाबद्ददल त्यांचे सोलापूरचे पोलीस  आयुक्त हरिष बैजल , उपायुक्त , सहाय्यक आयुक्तसह पोलीस विभागातील अधिकारी व सहकाऱ्यांनी अभिनंदन करून  त्यांचे कौतुक केले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top