शेतकरी पुत्रासाठी कोडरमेंटर प्रोग्रॅम सुवर्णसंधी बिटहेल्प व शिवार फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्तुत्य उपक्रम

0

शेतकरी पुत्रासाठी कोडरमेंटर प्रोग्रॅम सुवर्णसंधी बिटहेल्प व शिवार फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्तुत्य उपक्रम

 Osmanabad news :- 

उस्मानाबाद :

कोविड नंतरच्या काळातील आयटी क्षेत्रातील संधी पाहता उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी पुत्रांना यांच्या उपयोग होण्यासाठी बिटहेल्प फौंडेशनने पुढाकार घेऊन मागील ७ वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरयांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार्या शिवार फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मोफत कोडरमेंटर प्रोग्रॅम कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाद्वारे २०२१ च्या किंवा आधीच्या पदवीधारकांना एक वर्ष विशेष आयटी प्रोग्रामिंगचे मार्गदर्शन देण्यात येईल व त्यानंतर नोकरीच्या विविध संधी देण्यात येतील. दहावीत किंवा बारावीत ७o% पेक्षा कमी किंवा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिक अथवा विद्यार्थी वय मर्यादा १८ ते २६ पूर्ण झालेल्या ही या कार्यक्रमाची पात्रता आहे. निवडक तरुणांना आयटी क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती मार्गदर्शन देणार आहेत.  तसेच सरावासाठी 1 वर्षाकरता लॅपटॉप देण्यात येईल. इच्छुकांनी contact@bithelpfoundation.org ई-मेलद्वारे आपला बायोडाटा अथवा माहिती पाठवावी याची शेवटची तारीख ५ जून २०२२ असेल. असे आवाहन शिवार फौंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी केले.  

या अधिच खरीपातील अतिवृष्टीच्या तडाख्याने प्रचंड नुकसान होऊन हातातोंडाशी आलेली पिके हिरावली गेली आहेत. बोगस बियाणे, दुबार-तिबार पेरणी, आर्थिक चिंता अशा एक ना अनेक परिस्थितीत आपण आतापर्यंत धीराने तोंड दिले आहे, पण शेवटी आताच्या परिस्थितीत त्यातून आलेली हतबलता यामुळे बेचैन होणे साहजिकच आहे, पण तरीही कृपया मायबापानो कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका किंवा विचार करू नका, हीसुद्धा वेळ निघून जाईल, आम्ही तुमच्या सोबत आहोत.कोणतीही अडचण असो, आपण त्यातून नक्की मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, पण हार मानू नका. फोन आल्यानंतर योग्य यंत्रणेशी जोडून देऊन मार्गदर्शन करून सल्ला, मार्गदर्शन देऊन, त्रस्त शेतकरयांना समुपदेशन करून मानसिक आधार देण्यात येईल त्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत झालेली आहे.फक्त शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ एक फोन करा, असे आवाहन शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी केले आहे.
यासाठी मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह, तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय गडपाटी, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top