मटका , जुगार विरोधी उस्मानाबाद जिल्ह्यात ११ ठिकाणी कारवाई

0



मटका , जुगार विरोधी उस्मानाबाद जिल्ह्यात ११ ठिकाणी कारवाई.

 

जुगार विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी काल दि.08.02.2023 रोजी 11 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात घटनास्थळावरील जुगार साहित्यासह रक्कम असा एकुण 12,370 ₹ माल जप्त करुन संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे खालील प्रमाणे गुन्हे नोंदवले आहेत.

1) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  तुळजापूर, बेबंळी,नळदुर्ग, मुरुम पो.ठा. हद्दीत 13.30 ते 16.50 वा. दरम्यान  4 छापे टाकले यात भिमनगर, तुळजापूर ग्रामस्थ- अजय जेटिथोर हे तुळजापूर बसस्थानकाचे मागे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 1,200 ₹ रक्कम बाळगलेले, तर  बेबंळी,ता. उस्मानाबाद ग्रामस्थ- अल्ताफ शेख हे बेबंळी येथील जहागीर शाहा यांच्या घरासमोर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 1,660 ₹ रक्कम बाळगलेले, तर  सालेगाव, ता. उमरगा ग्रामस्थ- बालाजी धानेराव हे नळदुर्ग बसस्थानकाच्या पाठीमागे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 1,720 ₹ रक्कम बाळगलेले, तर येणेगुर, ता. उमरगा येथील- शाहुराज सावंत हे येणेगुर येथे एमएसईबी सबस्टेशन समोर टपरीमध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 600 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

2) तुळजापूर च्या पथकाने  तुळजापूर शहरात 15.15 वा. दरम्यान  छापा टाकला. यात मोर्डा, ता. तुळजापूर  ग्रामस्थ- महादेव पांडागळे हे तुळजापूर येथील साठे चौक ते उस्मानाबाद रोडलगत कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 1,200 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

3) उमरगा च्या पथकाने  उमरगा शहरात 15.30 वा. दरम्यान  छापा टाकला. यात उमरगा  ग्रामस्थ- रियाज शेख हे उमरगा शहरातील बंजारा हॉटेल जवळ कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 1,190 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

4) येरमाळा च्या पथकाने  येरमाळा येथे 13.35 वा. दरम्यान  छापा टाकला. यात येरमाळा, ता. कळंब  ग्रामस्थ- अस्लम तांबोळी, सुरेश पवार हे दोघे  येरमाळा येथील अल्ताफ पान शॉपचे बाजूला कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 1,160 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

 5)वाशी च्या पथकाने  वाशी पो.ठा. हद्दीत 11.40 वा. दरम्यान  छापा टाकला. यात वाशी  ग्रामस्थ- अमोल मोरे हे सारोळा कडे जाणारे रोडलगत  वाशी येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 680 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

6)उस्मानाबाद (ग्रा) च्या पथकाने  उस्मानाबाद (ग्रा) पो. ठा. हद्दीत 15.30 वा. दरम्यान  छापा टाकला. यात सारोळा (बु), ता. उस्मानाबाद ग्रामस्थ- सतिश गायकवाड हे आपल्या राहत्या घरा समोर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 690 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

7)भुम च्या पथकाने  भुम पो.ठा. हद्दीत 16.40 वा. दरम्यान  छापा टाकला. यात भुम ग्रामस्थ- सतिश पडवळकर हे पाथरुड बसस्थानक येथे  कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 610 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

8)परंडा च्या पथकाने परंडा पो.ठा. हद्दीत 20.35 वा. दरम्यान  छापा टाकला. यात भोत्रारोड, परंडा ग्रामस्थ- संतोष माने हे परंडा बसस्थानकच्या डाव्या बाजूस  कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह एकुण 610 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

    यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत संबधीत पो.ठा. येथे स्वतंत्र  11 गुन्हे नोंदवले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top