हजरत खाॅजा शमशोद्दीन गाजी (रहे) उरुसानिमीत्त डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी घेतले दर्शन
उस्मानाबाद : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान,सुफी संत हजरत खाॅजा शमशोद्दीन गाजी (रहे)यांच्या ७१८व्या उरुसानिमीत्त. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा धनेश्वरी शिक्षण समूहाचे संस्थापक डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी दर्गा स्थळी भेट देऊन फुलांची चादर अर्पण करून दर्शन घेतले.
यावेळी मा.नगरसेवक बाबा मुजावर, मा.नगरसेवक कुणाल भैय्या निंबाळकर,बबलु शेख,जयंत देशमुख,ॲड योगेश सोन्नेपाटील,ॲड अविनाश जाधव,फयाज शेख,मुस्तफीर शेख,अजय देशपांडे,ओंकार सुतार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.