आ.सतिश चव्हाण यांनी लोहारा येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन कोविड परिस्थितीचा आढावा घेतला

0
पदवीधर मतदार संघाचे आ.सतिश चव्हाण यांनी लोहारा येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन कोविड परिस्थितीचा आढावा घेतला 

( इकबाल मुल्ला )

लोहारा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने पदवीधर मतदार संघाचे आ.सतिश चव्हाण यांनी लोहारा येथील ग्रामीण रुग्णालयास दि.4 मे 2021 रोजी भेट देऊन कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. येथील ग्रामीण रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय यंत्रसामुग्री अभावी गंभीर रुग्णांना तुळजापूर, उस्मानाबाद येथे उपचारासाठी जावे लागत आहे. याठिकाणी व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचे लक्षात आले. आ.सतिश चव्हाण यांनी लागलीच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून येथील परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. याठिकाणी ऑक्सिजन लिक्विड प्लांट, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स, बायपॅप मशिन्स आदी वैद्यकीय यंत्रसामुग्रीची नितांत गरज असून ती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून लवकरच हा प्रश्न मार्गी लावला जाईल असे सांगितले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.गोविंद साठे यांना सदरील यंत्रसामुग्रीचा प्रस्ताव तातडीने जिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्याची सूचना केली. व तसेच आ.सतिश चव्हाण यांनी तहसीलदार संतोष रूईकर व गटविकास अधिकारी सोपान अकेले यांची भेट घेऊन यांच्याशी तालुक्यातील कोविड परिस्थितीबाबत चर्चा केली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, जालिंदर भाऊ कोकणे, डॉ.काळे, सतीश इंगळे, हाजी बाबा शेख, पिंटू पाटील, आदि, उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top