OSMANABAD :- जिल्हयामध्ये दि .15 व 16 मे रोजी कोविड लसीकरण सत्राचे आयोजन नाही - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
OSMANABAD :- कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देणेकरीता पहिला डोस घेतल्यानंतर किमान १२ आठवडयाचे ( 84 दिवस ) अंतर ठेवणेबाबतच्या भारत सरकारच्या मार्गदर्शक सुचना प्राप्त झालेल्या आहेत , त्या अनुषंगाने कोविन पोर्टलवर काही बदल पुढील दोन दिवसामध्ये होणार आहेत . त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयामध्ये दि . 15 व 16 मे 2021 रोजी कोठेही कोविड लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आलेले नाही . कोविन पोर्टलवरील बदल पुर्ण होताच पुढील लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती कौस्तुभ दिवेगावकर जिल्हाधिकारी यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे