शंभूराजे जयंती निमित्त तांदूळ वाटप

0

शंभूराजे जयंती निमित्त तांदूळ वाटप 


परंडा : -  प्रतिनिधी- 

स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे जयंती निम्मित श्रीमंतराजे प्रतिष्ठाण,कपिलापुरी व शंभुसेना महाराष्ट्र राज्य,धाराशिव जिल्हा यांच्या वतीने उम्मीद HIV/AIDS बाधित महिला व बालक आधार उपचार व पुनर्वसन प्रकल्प कुर्डुवाडी येथे अन्नदान म्हणून  २१ किलो तांदूळ देण्यात आले.कोविड- १९ मुळे शंभुराजे जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात न करता अन्नदाण करून साजरा करावा असा मानस श्रीमंतराजे  प्रतिष्ठाण अध्यक्ष तथा शंभूसेना महाराष्ट्र राज्य,धाराशिव जिल्हाध्यक्ष रणजीत महादेव पाटील यांचा होता.सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या प्रतिष्ठाणच्या वतीने हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.उम्मीदच्या सर्वेसर्वा प्रमिलादीदी जाधव यांनी प्रतिष्ठाणचे व शंभुसेनेचे  आभार व्यक्त केले.याप्रसंगी महेश आवाने,रुपेश गोरट्याल उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top