नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड,बांबु लागवड व वृक्ष लागवड या घटकांकरिता अर्ज करण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत
उस्मानाबाद, दि.14 (जिमाका):-कृषी विभाग महाराष्ट्र शासन व जागतिक बँक सहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्हयातील हवामान बदलामुळे उदभवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करणे,शेतकऱ्यांना शेती पुरक व्यवसाय करण्यास सहाय्य करणे या उददेशाने जिल्हयातील 282 गावांमध्ये 2018-19 पासून प्रकल्पाची अंमलबजावणी करणे सुरू आहे.प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड,बांबु लागवड व वृक्ष लागवड या घटकाची 2022-23 मधील लागवडीसाठी अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर, 2022 अखेरपर्यंत राहील.तदनंतर प्रकल्पांतर्गत या घटकाखाली अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
सप्टेंबर 2022 अखेर पर्यंत एकूण प्राप्त अर्जावर निकषानुसार पुर्वसंमती मिळाल्यानंतर पात्र अर्जदारानी प्रत्यक्ष लागवड नोव्हेंबर 2022 अखेरपर्यंत पुर्ण करणे आवश्यक आहे.सदर विषयी संबंधीत शेतकऱ्याने हमीपत्र लिहून देणे गरजेचे आहे प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड,बाबु लागवड व वृक्ष लागवड या घटकांचा लाभ घेण्याकरिता प्रकल्प गावातील इच्छुक असलेल्या शेतकरी बांधवांनी प्रकल्पाने उपलब्ध करून दिलेल्या htt:dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रामध्ये संबंधीत शेतकऱ्यांचे आधारकार्ड,सातबारा उतारा,आठ-अ मोबाईल क्रमांक,अर्जदार अनुसुचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र सादर करावे.
एकदा नोंदणी केल्यानंतर प्रकल्पातील समाविष्ट फळबाग लागवड,बांबु लागवड व वृक्ष लागवड बाबीकरिता स्वतंत्र अर्ज करावा.अधिक माहितीसाठी प्रकल्प गावातील संबंधीत कृषी सहाय्यक किंवा समुह सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तिर्थकर यांनी केले आहे.