सन 1982 पासून प्रलंबीत असलेल्या कबाल्याचा प्रश्न लवकरच सुटणार
सन 1982 पासून प्रलंबित असलेल्या मौजे. गोरेवाडी ता. जि. उस्मानाबाद येथील ग्रामस्थांच्या कबाल्याचा प्रश्न मा. खासदार श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व मा. आमदार श्री. कैलासदादा पाटील यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागणार आहे.
सन 1982 साली तत्कालीन सरपंच एल. एस. जाधव यांच्या प्रयत्नामुळे गोरेवाडी गावास गावठाण मंजूर झाले. परंतु कबाल्याची कागदपत्रे गहाळ झाल्यामूळे मिळत नव्हती कबाले मिळावे यासाठी एल. एस. जाधव व गोरेवाडी ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार काल दि. 13 सप्टेंबर 2022 रोजी खासदार श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार श्री. कैलासदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्यासोबत बैठक घेतली.
याबैठकीत सदरील कबाल्याबाबतच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा होवून मौजे. गोरेवाडी येथील कबाले प्रलंबीत कबाले जिल्हाधिकारी महोदयांनी येत्या आठ दिवसात संबंधीत सर्व कागदपत्रे तपासून अहवाल सादर करण्याच्या सुचना देउन कबाले वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. सदरली प्रश्नाचा पाठपुरावा करून बैठक लावून प्रश्न सुटणार असल्याने गोरेवाडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.