अमृत महोत्सव आपल्या स्वातंत्र्याचा
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अमृत महोत्सव दिनांक १७ सप्टेबंर रोजी मोठया दिमाखात साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला असून भव्य शोभा यात्रेचे नियोजन देखील करण्याल आले आहे. निजाम राजवटीतून मराठवाडा स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मोठी चळवळ उभी करावी लागली होती. या लढयामध्ये अनेकांना हुतात्म्य प्राप्त झाले होते. या संघार्षाची जाणीव तरूण पिठीला रहावी यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रम आयोजीत करून साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये व्याख्याने, शोभायात्रेव्दारे देखाव्यांचे सादरीकरण, स्मृतीस्तंभाची स्वच्छता, व स्मृतीस्तंभाचे पुजन, स्वातंत्र्य लढयावर आधारीत चित्रफीतीचे सादरीकरण व स्वातंत्र्य सेनानी व त्यांच्या कुटूंबियांचा यथोचीत गौरव करण्यात येणार आहे.
शोभा यात्रेतील सहभाग वाढावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी उत्कृष्ठ देखावे व सादरीकरणला पारितोषके देण्यात येणार आहेत. प्रथम, व्दितीय व तृतीय विजेत्यांना अनुक्रमे रू. ३१, २१, हजार रूपये व पारितोषकासह सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व शाल श्रीफळ देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच ५ गटांना प्रोत्साहनपर रू. १०,०००/- पारितोषक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व शाल श्रीफळ देण्यात येणार आहे. तज्ञ समितीव्दारे पारदर्शक पध्दतीने विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. ईच्छुकांनी नांव नोंदणीसाठी भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर (9422069864), मा.गट नेता न.प. युवराज नळे (9623859511) या भ्रमणध्वणी वर संपर्क साधावे.
या शोभायात्रेमध्ये जिल्हयातील विविध गणेश मंडळे, नवरात्र मंडळे, जयंती उत्सव समित्या यांनी सहभागा घ्यावा, असे आव्हाना आमदार श्री. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.