तुळजापूर - मंगरुळ येथे मुलीच्या जन्माचे भव्य स्वागत : रस्त्यावरून फुले अंथरून बॅन्डपथक व फटाक्यांची आतषबाजी ..

0
मंगरुळ येथे मुलीच्या जन्माचे भव्य स्वागत. 

बसस्थानक ते घरापर्यंत  रांगोळी व  रस्त्यावरून फुले अंथरून बॅन्डपथक व फटाक्यांची आतषबाजी करीत औक्षण करुन केले  स्वागत

तामलवाडी - मुलगी - मुलगा समानतेच्या कितीही वल्गना केल्या तरी आजही जन्माला येणाऱ्या  मुलीचे व मुलाचे स्वागत शहरी व ग्रामीण भागात  वेगवेगळ्या  पद्धतीने  होते हे नाकारता येत नाही. परंतु  तुळजापूर  तालुक्यातील मंगरूळ येथे मुलगी जन्मानंतर तिची अवहेलना करणार्‍या किंवा  गर्भपात करणार्‍या समाजाला मंगरुळ येथील दगडु रावसाहेब डोंगरे यांचे सुपुत्र सागर दगडु डोंगरे  कुटूंबियांनी मुलीच्या जन्माकडे साक्षात लक्ष्मीच्या  दृष्टीकोनातून पाहून बसस्थानक ते घरापर्यंत रांगोळी, रस्त्यावर फुले  अंथरून  बॅन्डपथकासह फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटून  स्त्री  जन्माचे अनोख्या पद्धतीने  स्वागत करीत समाजातील  अनिष्ट परंपरेला चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे. मंगरुळ येथील डोंगरे कुटुंबीयांना पहिलीच  मुलगी  झाली. त्यामुळे  डोंगरे कुटुंबात  आनंदाला पारावर  राहिला नाही. डोंगरे कुटुंबातील सदस्यांनी मुलीला दवाखान्यातून गावात आणल्यानंतर  मुलीच्या जन्मानिमित्त बसस्थानक  ते घरापर्यंत  रांगोळी, व रस्त्यावर  फुले अंथरून  बॅन्डपथकासह  व फटाक्यांची आतषबाजी करीत गावातून  मिरवणूक  काढून अनोख्या पद्धतीने स्त्री जन्माचे स्वागत केले आहे. याप्रकारे समाजाला एक संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. स्त्री  भ्रूण  हत्येचे प्रमाण  वाढल्याने स्त्री पुरुष जन्म  दरात कमालीची तफावत निर्माण  झाली आहे.  परिणामी  आज लग्नाला मुलीही मिळत नाहीत. गर्भपात करणार्‍या अनेक  घटना सध्या  घडत असताना डोंगरे कुटुंबियांनी मुलगा  किंवा  मुलगी  असा भेद करण्यापेक्षा  ते आपले मुल आहे, ती आपल्या  घरची लक्ष्मी  आहे. हा विचार  करत या सर्व घटनेला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. या डोंगरे  कुटुंबीयांतील सदस्यांनी स्त्री जन्म मोठ्या थाटमाटात साजरा केला आहे. मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांनी  गावातील  रस्त्यावर  रांगोळीची सजावट जिलेबी  वाटून स्त्री जन्माचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.

      एखाद्या लग्न सोहळ्याला लाजवेल अशा पद्धतीने या मंगरुळ  येथील आशा दगडु डोंगरे  कुटुंबीयांनी आपल्या घरी जन्मलेल्या मुलींचे स्वागत केले आहे. तर मुलीच्या जन्माचे या अनोख्या पद्धतीच्या स्वागत सोहळ्याची संपूर्ण पंचक्रोशीत जोरदार चर्चा आहे. त्याच बरोबर या उपक्रमामुळे मुलींची गर्भात हत्या करणाऱ्या नराधमांना चपराक बसली आहे. या निमित्ताने डोंगरे कुटुंबीयांनी मुली वाचवा असा संदेश दिला आहे. अशा प्रकारे  स्त्री  जन्माचे  स्वागत  प्रत्येक गावात होणे याची नितांत  गरज  असल्याचे मत ग्रामस्थामधून व्यक्त केले जात आहे.  

        मुलगी जन्माचे स्वागत करताना मिरवणूकी दरम्यान किसन आप्पा डोंगरे अभिजीत डोंगरे  सागर दगडु डोंगरे  , आई प्रणाली सागर डोंगरे,
  बप्पा डोंगरे ,समाधान सरडे,  आण्णा लबडे ,पंचायत समिती  सदस्य आण्णा सरडे, पोलीस पाटील लक्ष्मण माळी ,तात्या खडांळकर ,अविनाश डोंगरे ,  विकास  सावंत, महेश  खोपडे, संभाजी लबडे, सौरभ खोपडे , समीर शेख, वैभव डोंगरे, यशपाल लबडे , अनिल लबडे, हर्षवर्धन डोंगरे, अंगनवाडी सेविका उर्मिला कोरेकर, बालिका डोंगरे, शोभा जेटीथोर,रूकुबी मुलाणी, विजया ठाकरे, संगीता शिरगिरे,A.NM.गडदे पाटील मॅडम, अर्चना डोंगरे , स्वाती डोंगरे आश्विनी डोंगरे , रेखा डोंगरे, सुप्रिया सरडे, 
आदीसह मित्रकंपनी, नातेवाईक सहभागी झाले होते.

बातमी लेखन :- सर्जेराव गायकवाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top