Osmanabad जिल्ह्यात 4 ठिकाणी फसवणुक गुन्हे दाखल
पोलीस ठाणे, भुम: भुम येथील अधिराज एजन्सी येथुन बारामती पुणे येथील बाळासाहेब मोरे व मारुती भोर यांनी डिसेंबर 2020 मध्ये 1,18,801 रु.चे बांधकाम साहीत्य खरेदी करुन धनादेश दिला. तो धनादेश अकाउंट बंद असल्याने वटला नाही. अशा प्रकारे त्यांनी फसवणुक केल्याने एजन्सी चालक अभिजीत गाढवे यांनी 13 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरे वरुन नमुद दोघा विरुध्द भादंस 420,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद शहर: हौसेराम थोरात, सत्तार शेख, प्रताप देशमुख सर्व रा. उस्मानाबाद यांनी ॲडव्होकेट दिप्ती जयंत देशपांडे रा.सांजा रोड यांच्या मयत वडीलांच्या जागेचा बनावट करारनामा 5.4.2017 रोजी तयार करुन जागेवर बांधकाम केले. अशा मजकुराच्या दिप्ती देशपांडे यांनी 13 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरे वरुन नमुद दोघा विरुध्द भादंस 420,464,467,468,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, लोहारा: लोहारा हायस्कुल मधील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणा-या 92,144 रु. किमतीच्या तांदुळाचा सुधाकर पांचाळ रा.लोहारा यांनी सन 2018 ते 2020 या काळात अपहार केला आहे. अशा मजकुराच्या राजेंद्र कदम रा.लोहारा यांनी 13 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादंस 409 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, उमरगा: गुंजोटी ता.उमरगा येथील जयदिप कुलकर्णी यांच्या भ्रमणध्वनीवर 11 फेब्रुवारी रोजी अज्ञाताने कॉल करुन तुमचे बीएसएनएल सिमकार्ड चालु करुन देतो असे सांगुन दोन मोबाईल ॲप्लिकेशन्स डाउनलोड करुन त्यात बँक खात्याची माहीती भरण्यास सांगितली. जयदिप कुलकर्णी यांनी तसे केले असता त्यांच्या बँक खात्यातील 5,92,081 रु. इतरत्र स्थलांतरीत झाले. अशा मजकुराच्या जयदिप कुलकर्णी यांनी 13 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादंस 409 व माहीती तंत्रज्ञान अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.