मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती उस्मानाबाद यांच्या वतीने आयोजित चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेस उत्तम प्रतिसाद.

0

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती उस्मानाबाद यांच्या वतीने आयोजित चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेस उत्तम प्रतिसाद.

उस्मानाबाद :- मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती उस्मानाबाद यांच्या वतीने आयोजित चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेस उत्तम प्रतिसाद.
उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल च्या प्रांगणात सदरील स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभर दडपणाखाली राहिलेले बालगोपाळ या स्पर्धेच्या निमित्ताने मनमकोकळ्या पद्धतीने व्यक्त झाले.
मध्यवर्तीच्या वतीने शिवजयंती निमित्त प्रतिवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मुलांच्या सुप्तगुणांना चालना मिळावी या उद्देशाने हे उपक्रम राबवले जातात. काल झालेल्या चित्रकला...आणि रांगोळी स्पर्धेत शहरपरिसरातील शंभरावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
मुलांनी काढलेली विविधांगी चित्रे आणि रांगोळ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. सदरील स्पर्धा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली जावी यासाठी स्पर्धा संयोजक म्हणून श्री आनंद वीर आणि श्री प्रशांत गुरव यांनी तसेच परीक्षणासाठी श्री संजय मैंदर्गे यांनी योगदान दिले. 
यावेळी मध्यवर्ती शिवजयंती चे अध्यक्ष आशिष मोदानी, कार्याध्यक्ष राम मुंडे, उपाध्यक्ष सुरज शेरकर, संघटक विशाल पाटील, रोहित बागल, युवराज राजेनिंबाळकर, महेश पोतदार , अग्निवेश शिंदे, सोशल मिडिया प्रमुख प्रसाद राजमाने आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top