भव्य कर्मचारी क्रिकेट स्पर्धेत अनुक्रमे ज्ञानप्रसारक मंडळ संघ प्रथम पारितोषिक , पोलीस स्टेशन संघ द्वितीय पारितोषिक तर तृतीय पारितोषिक न्यायालयीन कर्मचारी संघाने पटकावले
कळंब:- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे भव्य कर्मचारी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन दिनांक १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत डिकसळ येथील मोहेकर महाविद्यालयाच्या क्रीडांगणात आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धांचे हे दुसरे वर्ष असून आपल्या दैनंदिन व्यस्त कामातून मनोरंजन व विरंगुळा मिळावा, उत्तम आरोग्य प्राप्ती व्हावी या उद्देशाने स्पर्धा आयोजित करण्यात येतात. सदर दिनांक ११ फेब्रुवारी २०२१ रोजी स्पर्धेचे उद्घाटन झाले प्रमुख पाहुणे तहसीलदार श्री रोहन शिंदे, तसेच प्राचार्य डॉ. सुनिल पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. अशोकराव मोहेकर ,सचिव ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले होते. या दुसऱ्या वर्षी होणाऱ्या कर्मचारी क्रिकेट स्पर्धामध्ये एकूण १८ खेळाडू संघ शासकीय-निमशासकीय व सेवाभावी संस्थेच्या वतीने सहभाग नोंदवला होता.
या तीन दिवसीय चाललेल्या सामन्यामध्ये अनुक्रमे तृतीय पारितोषिक न्यायालयीन कर्मचारी संघ (३००१/-)यांनी द्वितीय पारितोषिक पोलीस स्टेशन , (₹५००१/-)यांनी तर प्रथम पारितोषिक ज्ञानप्रसारक मंडळ (₹ ७००१/-)संघाने मिळवला. तर बेस्ट बॅट्समन अजित मोरे यांना व बेस्ट बॉलर श्री विशाल पवार यांना देण्यात आले. बक्षीस वितरण १४ सप्टेंबर २०२१ रोजी डिकसळ येथील क्रीडांगणावर करण्यात आले .यावेळी पोलीस महानिरीक्षक पवार साहेब ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल पवार, प्रा. जगदीश गवळी, संतोष घाटपारडे ,अंगद भाऊ बारगुले, सनी कांबळे हे उपस्थित होते. बक्षीस अनुक्रमे प्रथम पारितोषिक ७००१/( अजित भैय्या काळे ), द्वितीय पारितषिक ५००१( अंगद भाऊ बारगुले ), तृतीय पारितोषिक ३००१/-( श्रेया भारत गॅस) बेस्ट बॉलर (आदर्श इंग्लिश स्कूल),बेस्ट बॅट्समन असे ठेवण्यात आले होते.
या आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धांचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांनी, क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहून आनंद घेतला, भरघोस प्रतिसाद मिळाला. या स्पर्धासाठी असे मोहेकर महाविद्यालयाच्या संयोजन समितीतर्फे श्री अरविंद शिंदे, श्री संदीप सूर्यवंशी , आणि डॉ. हनुमंत चौधरी आदींनी उत्तमप्रकारे नियोजन केले होते.