google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 कळंब साठी ऑक्सीजन सुविधा असणारी अद्यावत रुग्णवाहिका - तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून

कळंब साठी ऑक्सीजन सुविधा असणारी अद्यावत रुग्णवाहिका - तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून

0
कळंब साठी ऑक्सीजन सुविधा असणारी अद्यावत रुग्णवाहिका - तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक रुग्ण  उशिराने दवाखान्यात दाखल होत असल्याने अथवा सहव्याधी असल्याने अत्यवस्थ होत आहेत. त्यामुळे अशा कोरोना रुग्णांवर कळंब येथील खाजगी व सरकारी रुग्णालयात उपचार करणे साठी मर्यादा येत आहेत.  अत्यवस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी उस्मानाबाद, लातूर, बार्शी, अंबाजोगाई अथवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी पुरेशा रुग्णवाहिका उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांची मोठी गैरसोय होत होती. ही गरज लक्षात घेऊन तुळजापूर-उस्मानाबाद चे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कळंब करांसाठी तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ऑक्सिजन सुविधा असणारी अद्यावत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.

 यामुळे कळंब तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. रुग्णवाहिका कळंब येथे पोहोचताच मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी नेताजी पाटील, उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, ह.भ.प. बोधले, डॉ जोशी, पिंगळे, बाजार समिती सभापती रामहरी शिंदे, आदी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top