पिस्तमवाडी साकत खु:येथे ई पीक पहाणीचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

0
पिस्तमवाडी साकत खु:येथे ई पीक पहाणीचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन...

(परंडा -विजय शेवाळे)

 उस्मानाबाद :- १७ सप्टेंबर रोजी मौजे पिस्तमवाडी साकत खु : येथे ई पीक पहाणी चे केले मार्गदर्शन. परंडा तालुक्यातील  पिस्तमवाडी साकत खु येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत ई-पीक पाहणीबाबत कृषी सहायक एस के गुंड यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ई-पीक नोंदणी पीक विमा, कृषी कर्जासाठी, ऊस नोंदीसाठी, नैसर्गिक आपत्ती अनुदान मिळण्यासाठी, खरेदी-विक्री व्यवहार सुलभ होण्यासाठी, शासनाला गावनिहाय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करून अचूक माहिती मिळण्यासाठी, कृषी विभागाच्या विविध योजना राबविण्यासाठी किती महत्त्वाची आहे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी  सरपंच रामभाऊ मुसळे, लघुउद्योग सल्लागार गणेश चव्हाण तसेच गावातील उपस्थित शेतकरी संदीप ढगे भागवत ढगे कैलास ढगे महादेव ढगे हनुमंत ढगे आश्रोबा चव्हाण रामेश्वर ढगे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top