एमआयएम च्या सईद फारूकी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश....
औरंगाबाद :- येथील एमआयएम पक्षाच्या नगरसेविका साजेदा सईद फारुकी आणि सईद फारूकी यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ना. जयंत पाटील यांनी पक्षप्रवेश केलेल्या मान्यवरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे व औरंगाबादचे शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख उपस्थित होते.
औरंगाबाद येथुन निवडणूक आलेल्या ( AIMIM ) एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील हे
महाराष्ट्रातील एम आय एम मुख प्रचारक म्हणून ओळखले जातात मात्र त्यांच्यात मतदान संघातील पक्षाचे नगरसेविका व त्यांचे पती यांनी काल दिनांक 18 सप्टेंबर रोजी मा. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्या आपल्याच मतदार संघातील ताकद कमी होतानाचे चित्र सध्या औरंगाबाद येथे दिसत आहे. मागणी वेगवेगळ्या निवडणुकीत प्रचारक म्हणून खा. इम्तियाज जलील पाहण्यास मिळाले आहेत मात्र त्यांच्याच मतदारसंघांमध्ये असे प्रकार घडल्याने आगामी महाराष्ट्रातील निवडणुकाच्या तयारीने महाराष्ट्रात ताकद बळकट करण्याचे प्रयत्न खासदार इम्तियाज जलील करत आहेत मात्र मतदारसंघातील येत असे प्रकार घडल्याने याचे चित्र महाराष्ट्रात देखील उमटू शकतात...
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा एमआयएम मध्ये प्रवेश...
बीड जिल्ह्यातील परळी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवकांनी दोन दिवसा अगोदर खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीमध्ये एमआयएम पक्षामध्ये प्रवेश केले त्याबाबत इमतियाज जलील यांनी आपल्या पेजवरून ही माहिती दिली होती मात्र त्यांच्याच मतदारसंघात एमआयएमच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याचे चित्र पाहण्यास मिळाले याबाबत मा. जयंत पाटील यांनी आपल्या फेसबुक पेजवरून फोटो शेअर करत एमआयएमच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची माहिती दिली आहे.