google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुका येथील सीना कोळेगाव उपसासिंचन प्रकल्पाचे अतिरीक्त वाहुन जाणारे पाणी अनाळा-इनगोदा सिंचन प्रकल्पात सोडण्यात यावे -- आ.सुजितसिंह ठाकूर

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुका येथील सीना कोळेगाव उपसासिंचन प्रकल्पाचे अतिरीक्त वाहुन जाणारे पाणी अनाळा-इनगोदा सिंचन प्रकल्पात सोडण्यात यावे -- आ.सुजितसिंह ठाकूर

0


उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुका येथील सीना कोळेगाव उपसासिंचन प्रकल्पाचे अतिरीक्त वाहुन जाणारे पाणी अनाळा-इनगोदा सिंचन प्रकल्पात सोडण्यात यावे -- आ.सुजितसिंह ठाकूर

उस्मानाबाद/प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुका येथील सीना कोळेगाव उपसासिंचन प्रकल्पाचे अतिरीक्त वाहुन जाणारे पाणी अनाळा-इनगोदा सिंचन प्रकल्पात सोडण्यात यावे, अशा मागणीचे पत्र भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंतजी पाटील यांना दिले आह या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुका येथील सीना कोळेगाव उपसासिंचन हे यावर्षी 100 % पुर्ण क्षमतेने भरलेले असुन सध्या या प्रकल्पातुन अतिरीक्त असणारे पाणी 8 दरवाज्याद्वारे खाली सिना नदीत सोडण्यात आले आहे. तालुक्यातील हा प्रकल्प महत्वाचा व शेतक-यांना वरदान ठरणारा आहे. गत वर्षी या प्रकल्पातील अतिरीक्त वाहुन जाणारे पाणी अनाळा ता. परंडा येथील अनाळा उपसा सिंचन साठवण तलावामध्ये कॅनॉलद्वारे सोडण्यात आले होते. यामुळे तालुक्यातील अनाळा, मुगांव, कार्ला, रत्नापुर, मलकापुर, वाटेफळ व परिसरातील मोठ्या प्रमाणात जमीन ओलीताखाली आली होती. सध्या अनाळा उपसा सिंचन साठवण तलावामध्ये  30 % पाणी साठा उपलब्ध आहे. सीना कोळेगाव उपसासिंचन प्रकल्पातुन वाहुन जाणारे अतिरीक्त पाणी कालव्याद्वारे अनाळा उपसा सिंचन योजनेअंतर्गत हा तलाव भरुन परिसरातील मोठ्या प्रमाणात जमीन सिंचनाखाली येणार आहे. तरी परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव उपसासिंचन प्रकल्पातुन अतिरीक्त वाहुन जाणारे पाणी अनाळा उपसा सिंचन योजनेत तात्काळ सोडण्याचे आदेश संबंधित अधिका-यांना द्यावेत, असे पत्रात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top