google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 आमदार कैलास पाटील धावले ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या मदतीला

आमदार कैलास पाटील धावले ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या मदतीला

0

आमदार कैलास पाटील धावले ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या मदतीला 

   साखर आयुक्त मा.शेखर गायकवाड यांची साखर संकुल, पुणे येथे आ कैलास पाटील यांनी भेट घेऊन धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिल वितरणाच्या विलंबाबाबत चर्चा केली. 

उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे जानेवारी ते मार्च दरम्यान
 उस्मानाबाद, कळंब तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप करण्यासाठी नेला आहे. परंतु अद्याप पर्यंत या कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊसाचे बिल वितरीत केलेले नाहीत. ऊस तोडणी होऊन जवळपास ५ ते ६ महिने झालेले असतानाही साखर कारखाने शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे अदा न करता, प्रत्येक वेळी पुढची तारीख देऊन चाल-ढकल करीत आहेत. सद्या खरीप पिकांवरील नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असल्याने तो आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे आपल्या स्तरावरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिल त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याबाबत उचीत कार्यवाही करण्याची मागणी आ कैलास पाटील यांनी साखर आयुक्ताकडे केली. 

यावेळी आयुक्त श्री.शेखर गायकवाड यांनी आठ दिवसात कारखानदारांनी ऊस बिल अदा करण्याबाबचे तसेच आठ दिवसांत कारखान्यांनी ऊस बिल दिले नाही तर त्यांच्यावर RRC अंतर्गत कारवाई करण्याचे आश्वासन दिले,असे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top