google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचे पुन्हा सत्याग्रह आंदोलन

उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचे पुन्हा सत्याग्रह आंदोलन

0
उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसने आज पुन्हा सत्याग्रह आंदोलन सुरू केलं आहे काल दिनांक २६ जुलै रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन केल्यानंतर ईडीच्या विरोधात काँग्रेस च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  पुन्हा सत्याग्रह सुरू केले आहे.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी खा. सोनिया गांधी यांना बजावण्यात आलेल्या ईडीच्या नोटिसी विरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक होत आहे त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी केंद्र सरकार सुड बुध्दीने कारवाई करत असून ही कारवाई थांबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी भाजपा,केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या, पुढील काळात उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस च्या वतीने रस्ता रोको आंदोलन, जेल भरो आंदोलन अशा प्रकारे तीव्र आंदोलने करण्यात येतील असा ईशारा यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी यावेळी दिला आहे

या सत्याग्रह आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील सर, डिसीसी बँकेचे संचालक मेहबूब पटेल, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष रोहित पडवळ, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अग्निवेश शिंदे, माजी नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, सरचिटणीस जावेद काझी, उमेश राजेनिंबाळकर, महिला काँग्रेस सरचिटणीस शिलाताई उंबरे, ज्योती सपाटे, राज्य प्रवक्ते हनुमंत पवार, विधी विभाग प्रदेश उपाध्यक्ष विश्वजित शिंदे, ओबीसी विभागाचे प्रदेश सदस्य धनंजय राऊत, आयुब पठाण, अशोक बनसोडे, मानवाधिकार विभागाचे अध्यक्ष प्रभाकर लोंढे, सुभाष हिंगमीरे, किशोर पाटील, महादेव पेठे, शहर उपाध्यक्ष आरेफ मुलाणी, संतोष पेठे, युवक काँग्रेसचे सरचिटणीस, कफिल सय्यद, स्वप्नील शिंगाडे, इम्रान हुसैनी, सलमान शेख, भारत काटे, सांस्कृतिक विभागाचे प्रेम सपकाळ, विद्यार्थी काँग्रेसचे सौरभ गायकवाड, सेवा दल शहराध्यक्ष अतुल चव्हाण, अविदाबाई चव्हाण, माहिती अधिकार विभागाचे अध्यक्ष शैलेश देव, बाबासाहेब कसबे, आकाश चव्हाण, हज्जू शेख यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top