विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

0

विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

उस्मानाबाद : शहरात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित ( दादा ) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद शहरातील भारत मंगल कार्यालयात गौस तांबोळी राष्ट्रवादी जिल्हा सचिव यांच्या व टायगर सोशल ग्रुपच्या वतीने  भव्य रक्त दान शिबिर घेण्यात आले रक्तदात्यांना भेट म्हणून भिंतीवरील घड्याळ देण्यात आले आहे. व जेवनाची व्यवस्था करण्यात आली होती.

गौस तांबोळी यांच्या वतीने व टायगर सोशल ग्रुपच्या वतीने जिल्हाभरामध्ये नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.  मा. अजितदादा ( दादा ) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने मोठ्या प्रमाणात जिल्हाभरात कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

आज दि.27 जुलै रोजी रक्तदान शिबिरास गौस तांबोळी, सचिन तावडे ,अमोल सुरवसे, मनोज मुदगल , सौरभ देशमुख , वैभव मोरे, निजाम नदाफ , आसेफ तांबोळी , बापू काकडे, मोईन तांबोळी , प्रशांत इंगळे, मोबिन तांबोळी, बाबा शेख , यांच्या सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top