राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हा उपाध्यक्ष समाधान बाराते यांच्या आमदार कैलास घाडगे-पाटील पाटील यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश

0

राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हा उपाध्यक्ष समाधान बाराते यांच्या आमदार कैलास घाडगे-पाटील पाटील यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश

धाराशिव : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे तसेच शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून, आमदार कैलास घाडगे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हा उपाध्यक्ष समाधान बाराते यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षात प्रवेश घेतला.

यावेळी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल आणि हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून शिवसेना संघटना बळकट कराल,असा विश्वास आ.पाटील यांनी व्यक्त केला

यावेळी बाजार समिती संचालक हणमंत बापू आवाड ,माजी पं स सदस्य रामहरी बप्पा मुंडे ,विभागप्रमुख राहुल पाटील ,ad रमेश मुंडे , बालाजी सांगळे सरपंच चुंब , नरसिंग पाटील ,पांडुरंग जाधवर आदि उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)