राजकीय कट्टा दिवाळी अंकाचे थेट हॉस्पिटलमध्येच मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

0

राजकीय कट्टा दिवाळी अंकाचे थेट हॉस्पिटलमध्येच मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते प्रकाशन


उस्मानाबाद -धाराशिव  : प्रतिनिधी -आज राजकीय कट्टा या दिवाळी अंकाचे प्रकाशन अत्यंत साधेपणाने मात्र ज्यांचे मुखपृष्ठ दिवाळी अंकावर आहे असे मनोज जरांगे पाटील यांच्या शुभ हस्ते  छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल येथेे करण्यात आले. यावेळी राजकीय कट्टाचे संपादक प्रा. सतिश मातने यांनी राजकीय कट्टाच्या कारकिर्दी बद्दल सविस्तर माहिती मनोज जरांगे पाटील यांना दिली. तसेच सर्व सभा लाईव्ह प्रक्षेपण करत असल्याचे देखील त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.

राजकीय कट्टाचा हा पहिलाच दिवाळी अंक आहे मात्र या अंकाबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी देखील समाधान व्यक्त करत मराठा आरक्षणासंदर्भात चार लेख यामध्ये घेतले त्याबद्दल देखील समाधान व्यक्त केले. समाजातील लोकांनी ज्या माध्यमात किंवा क्षेत्रात आपण काम करतो तेथे समाजाविषयी लेखन व योग्य मांडणी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली सर्व समाज एकजूट रहावे याकरिता माध्यमांनी प्रयत्न करावेत असे देखील यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top