पोलीस असल्याची बतावणी करुन सोन्याचे अंगठ्या घेवून जावून फसवणुक

0पोलीस असल्याची बतावणी करुन सोन्याचे अंगठ्या घेवून जावून फसवणुक.

धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे : ‍फिर्यादी नामे- हरी गोविंद माळी, वय 50 वर्षे, रा. पळसप ता. जि. धाराशिव हे दि. 05.01.2024 रोजी 11.30 वा.सु. पवारवाडी शिवारातुन मोटरसायकल क्र एमएच 25 ए. वाय 9578 वरुन जात होते. दरम्यान अनोळखी तीन इसमांनी काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर येवून फिर्यादीस थांबवून पोलीस असल्याची बतावणी करुन फिर्यादीचे बोटातील अंगठ्या काढण्यास सांगुन मोटरसायकलच्या डिग्गीमध्ये ठेवण्यासाठी पुडीमध्ये बांधतो असे सांगुन त्यांचेजवळ घेवून अंगठ्या कागदामध्ये न ठेवता कागदामध्ये लहान दगड ठेवून सोन्याचे अंगठ्या घेवून जावून फिर्यादी यांची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- हरी माळी यांनी दि.06.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम  420, 170, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)