नागरिकांसाठी " राईट टू हेल्थ " कायदा आणणार - पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत

0

नागरिकांसाठी " राईट टू हेल्थ " कायदा आणणार - पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत

धाराशिव दि.8 ) राज्यातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी लवकरच नागरिकांसाठी 
" राईट टू हेल्थ " कायदा आणणार  असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी केले.

 आज 8 जानेवारी रोजी शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात 50 खाटांचे सी सी यू ,आय पी एच एल प्रयोगशाळा आणि डी ई आय सी फेझ 2 या कामांचे भुमिपुजन पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत बोलत होते.आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे,पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,विभागीय आरोग्य  उपसंचालक डॉ.अर्चना भोसले,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश हरिदास, ऍड. मिलिंद पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री डॉ.सावंत पुढे म्हणाले,यापूर्वी जागरूक पालक सुदृढ बालक,माता सुरक्षित तर घर सुरक्षित आणि बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तसेच प्रधानमंत्री आयुष्यमान योजना आणि आभा कार्ड अशा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी राज्य शासन घेत आहे.सध्या तरुणाई वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांच्या अधीन होत आहे.त्यामुळे " आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे " हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       
 तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती करण्याची मोहीम राबविण्याबाबत आरोग्य यंत्रणेला प्रा.डॉ.सावंत यांनी निर्देश दिले. 
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य उपसंचालक अर्चना भोसले यांनी, सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी तर उपस्थितांचे आभार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला यांनी मानले.

याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थीनी वैद्यकीय  महाविद्यालयाचे प्राध्यापक,अधिकारी,कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)