शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कराचे अर्ज सादर करण्यास २० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
उस्मानाबाद,दि.2(जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या क्रीडा महर्षीचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
संचालनालयाने दि.13 जानेवारी 2023 रोजी प्रसिध्द केलेल्या वृत्तपत्र टिपण्णीद्वारे पुरस्करासाठी अर्ज सादर करण्यास दि.16 ते 30 जानेवारी 2023 अशी मुदत दिलेली होती. तथापि, या कालावधीत असलेल्या खेलो इंडिया आणि इतर स्पर्धांच्या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षण शिबीर आणि स्पर्धा यासाठी अर्ज करण्यास पुरेसा कालावधी न मिळाल्याने पुरस्कार अर्ज सादर करण्यास 20 दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी विनंती राज्यातील विविध क्रीडा संघटना आणि खेळाडूंनी शासनाकडे केली होती.
शासनाने विनंतीचा आणि वस्तुस्थितीचा सर्वंकष विचार करुन दि.20 फेब्रुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत पुरस्कार अर्ज ऑफलाईन पध्दतीने सादर करण्याच मुदतवाढ दिली आहे.
साहसी क्रीडा पुरस्कारासह सर्व क्रीडा पुरस्कारासाठी कामगिरीचा कालावधी त्या पुरस्कार वर्षातील 30 जून रोजी संपणाऱ्या वर्षासह विचारात घेण्यात येईल.
पुरस्कारासाठी अर्जाचे नमुने तसेच शासन निर्णय यासाठी क्रीडा विभागाच्या http://sports.maharashtra.gov.